पुणे - पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. वाहतूक कोंडीने शहराचा जीव गुदमरत असतानाच भरधाव वाहनांच्या खाली चिडवून मृत्यूमुखी पडणाऱ्याची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पुण्यामध्ये सरासरी तीन अपघात गेल्या 25 दिवसांमध्ये झाले आहेत. त्यामध्ये 31 जणांचा निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. इतकेच नव्हे तर 54 जण गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे जे गंभीर आहेत त्यांना सुद्धा आता आयुष्यभर अपंगत्व स्वीकारण्याची वेळ आली आहे. (Pune Accident) (Pune News)
19 मे ते 14 जून 2024 या कालावधीमध्ये पुण्यामध्ये तब्बल 70 अपघात घडले आहेत. या अपघातांना सर्वाधिक कारणीभूत पुण्यातील वाहनांचा भरधाव वेग कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे भरधाव वाहनांचा वेग पुणेकरांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. दारू पिऊन वाहने चालवण्याची संख्या सुद्धा मोठी आहे. अपघात झालेल्या सर्वच प्रकरणांचा उलगडा झाला नसला, तरी काही चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत. अपघातानंतर काही चालक अजूनही फरार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये अक्षरशः मृत्यूचे तांडव सुरू आहे.
No comments:
Post a Comment