मुंबई - पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातावरून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना ताजी असतानाच मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयातील (Sion Hospital) वरिष्ठ डॉक्टर राजेश डेरेंच्या कार धडकेत एका महिलेचा मृत्यू (women crushed by a speeding car) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताप्रकरणी राजेश डेरेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून सायन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. (Mumbai Latest News) (Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेची केईएम, नायर, सायन, कूपर आणि ट्रॉमा ही मोठी हॉस्पिटल आहेत. त्यापैकी शिव येथे सायन हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या गेट नंबर सातवर शुक्रवारी (24 मे ) रात्री 8.30 वाजता रुबेदा शेख (वय 60) रुग्णालयातून उपचार घेऊन घरी निघाल्या होत्या. त्याचवेळी सायन हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागाचे वरिष्ठ डॉ. राजेश डेरेंच्या निष्काळजीमुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान मृत रुबेदा शेख यांचा मुलगा सहनावाज शेख यांनी डॉ. राजेश ढेरे यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा, असा आरोप करत मागणी केली होती. महिलेचा अंगावर असलेल्या जखमावरून पोलिसांनी अपघाताचा अँगलने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर डॉक्टरच्या कारनेच अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सायन पोलिसांनी राजेश डेरे यांच्या विरोधात कलम 304 अ, 338, 177, 279, 184, 203 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला. पोलिसांना यामध्ये यश मिळालं असून आरोपी डॉक्टर राजेश डेरे यांना सायन पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी डॉक्टर राजेश डेरे हे दारू पिऊन गाडी चालवत होते का या संदर्भात सायन पोलीस पुढील तपास आणि सर्व टेस्ट करत आहेत. सायन पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला एक्सीडेंटल आणि डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
No comments:
Post a Comment