डिस्काउंट -
Redmi Note 13 5G चा बेस मॉडेल ६जीबी रॅम व १२८जीबी ऑप्शन १७,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. याचा ८जीबी रॅम व २५६जीबी आणि १२जीबी रॅम व २५६जीबी व्हेरिएंट अनुक्रमे १९,९९९ आणि २१,९९९ रुपयांमध्ये आले होते. आता या फोनच्या ६ जीबी रॅम मॉडेलसाठी १६,९९९ रुपये, ८ जीबी रॅमसाठी १८,९९९ रुपये आणि १२ जीबी रॅमसाठी २०,९९९ रुपये खर्च करावे लागतील. याची विक्री सेल अॅमेजॉनवर होत आहे.
Redmi Note 13 Pro 5G च्या बेस मॉडेलमध्ये ८जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज मिळते, ज्याची किंमत २५,९९९ रुपये होती. तर ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेल २७,९९९ रुपयांमध्ये आला होता. तसेच १२जीबी रॅम व २५६जीबी मॉडेलची किंमत २९,९९९ रुपये होती. आता हे अनुक्रमे २४,९९९ रुपये, २६,९९९ रुपये, आणि २८,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येतील.
Redmi Note 13 Pro+ 5G ची भारतात लाँच प्राइस ३१,९९९ रुपये होती. ज्यात ८जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेज मिळते. फोनचा १२जीबी रॅम २५६जीबी स्टोरेज आणि १२जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज मॉडेल लाँचच्या वेळी ३३,९९९ आणि ३५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध झाले होते. तर आता फोनच्या बेस व्हेरिएंटसाठी ३०,९९९ रुपये मोजावे लागतील. तर २५६जीबी जीबी मॉडेल ३२,९९९ रुपये आणि ५१२जीबी मॉडेल ३४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येतील.
No comments:
Post a Comment