बारामतीत यावेळी महायुती आणि महाविकासआघाडी अशी लढत आहे. महायुतीचा उमेदवार यावेळी राष्ट्रवादीच्या सुनेञा पवार असून त्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तर, महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहे. मात्र, महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचं चिन्हं घड्याळ असल्याने आजोबांना इथे भाजपचं चिन्हच दिसलं नाही. यामुळे आजोबा संतापले.
घड्याळ चिन्हामुळे तिथं यावेळी कमळ हे चिन्ह दिसत नव्हतं. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांचा हा असा संताप झाल्याचं बघायला मिळतंय. बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात नणंद विरोधात भावजयी असा सामना आहे. जरी हा नणंद भावयजीचा सामना असला तरी खरी लढाई माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये आहे.
No comments:
Post a Comment