Mega Block - रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 May 2024

Mega Block - रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक


मुंबई - रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवार १२ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. (Mumbai Mega Block)

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल १५ मिनिटे उशिराने असतील.

हार्बर मार्गावर अप आणि डाऊन लाइनवर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत वाशी/बेलापूर/पनवेल साठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक -
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. या लोकल विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांत थांबणार नाहीत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad