मुंबई - पनीर हा सर्वात पौष्टिक खाद्यपदार्थ म्हणून ओळखला जातो. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि बरेच काही असते पोषक तत्व असतात. पनीर हे आरोग्याच्या दैनंदिन गरज पूर्ण करण्यास मदत करते. पण आजकाल पनीरमधेही भेसळ होत आहे. गेल्या काही वर्षात अनेक बनावट पनीरच्या घटनाही समोर आल्या आहेत. तुम्ही खात असलेलं पनीर कदाचित सिंथेटिक पनीर असू शकतं. मग अशावेळी खरं पनीर कसं ओळखायचं ते जाणून घेणे गरजेचे आहे. (How to test fake paneer at home)
या टिप्स फॉलो करा -
पनीर नैसर्गिक की बनावटी हे तपासण्यासाठी तुम्ही आयोडीन टिंचर वापरू शकता. पॅनमध्ये पाणी घ्या आणि त्यात पनीर घालून उकळवा. नंतर ते थंड होऊ द्या आणि त्यावर आयोडीन टिंचरचे काही थेंब घाला. जर पनीरचा रंग निळा झाला तर समजा की हे बनावटी पनीर आहे.
पनीर खरेदी करण्यापूर्वी नेहमी एक छोटासा तुकडा खाऊन बघा. जर पनीरची चव खूप आंबट असेल तर पनीरमध्ये डिटर्जंट किंवा इतर काही निकृष्ट उत्पादनाची भेसळ असल्याची शक्यता असते.
पनीर पाण्यात उकळा, थंड होऊ द्या आणि नंतर त्यात सोयाबीन पावडर घाला. जर पनीरचा रंग हलका लाल झाला तर याचा अर्थ चीज डिटर्जंट किंवा युरियाने बनवले आहे.
पनीर थोड्या पाण्यात उकळा आणि ते थंड झाल्यावर त्यात थोडी तूर डाळ पावडर घाला आणि १० मिनिटे राहू द्यात. जर पनीरचा रंग हलका लाल झाला तर हे पनीर डिटर्जंट किंवा युरियाने बनवलेले असू शकते.
No comments:
Post a Comment