रेल्वे ब्लॉक दरम्यान एस टी, बेस्टच्या अतिरिक्त बस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2024

रेल्वे ब्लॉक दरम्यान एस टी, बेस्टच्या अतिरिक्त बस


मुंबई - आज, गुरूवार मध्यरात्री साडे बारा वाजेनंतर ठाणे स्थानकात सुरू होणारा ६३ तासांचा आणि उद्या, शुक्रवार मध्यरात्री साडेबारानंतर सीएसएमटीत ३६ तासांचा ब्लॉक (Mega Block) घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून एस टी (ST) महामंडळाकडून ५० जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर बेस्ट (BEST) प्रशासनाकडून ५५ बसच्या ४८६ फेऱ्या जादा चालवल्या जाणार आहेत. (Extra buses) 

एस टी च्या ५० जादा गाड्या - 
मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकात मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान मुंबईत ३ दिवसात ९५३ लोकल, ७२ मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होणार आहेत. प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने मुंबईतील कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाणेसाठी ५० जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवासी मागणी लक्षात घेता यात आवश्यकतेनूसार वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शनासाठी ठाणे आणि मुंबई आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने दिली.

बेस्टच्या ५५ जादा गाड्या -
मुंबईची लाइफलाईन असलेल्या रेल्वे प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कुलाबा, वडाळा, भायखळा स्थानक, दादर आदी ठिकाणांहून ५५ बसच्या ४८६ फेऱ्या जादा चालवल्या जाणार आहेत. कुलाबा बस स्थानकातून १२ जादा बसद्वारे २३२ अधिक फेऱ्या चवल्या जाणार आहेत. तर इतर ठिकाणाहून ४३ जादा बस चालवून २५४  चालवून अधिक फेऱ्या चवल्या जाणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी बेस्टकडून निरीक्षक आणि वाहतूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad