Lok Sabha Election - मुंबईत १८ ते २० मे 'ड्राय डे' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 May 2024

Lok Sabha Election - मुंबईत १८ ते २० मे 'ड्राय डे'


मुंबई - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 28- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात 18 मे 2024 रोजी (सायंकाळी सहा वाजेपासून) ते 20 मे 2024 रोजी मतदानसंपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आला आहे. मतदारसंघातील सर्व अनुज्ञप्या संबंधितांनी बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी दिले आहेत. (Dry Day in Mumbai)

28 मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील कार्यालयात आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामकाज आढावा बैठक झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मतदारसंघात 55 गुन्हे, सहा लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त -
28- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण 55 गुन्हे दाखल करण्यात आले असुन 56 आरोपीनां अटक करण्यात आले आहेत. दोन लाख 23 हजार 925 रूपयांची 647.29 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. चार लाख 50 हजाराचे एक वाहन जप्त् करण्यात आले आहे. असे एकूण सहा लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त् करण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडुन नऊ लाख 40 हजार इतक्या रकमेचे बंधपत्र घेण्यात आले आहे. गोडाऊन, वाईन शॉप, परमिट रुम, देशी दारूचे गोडाऊन, देशी बार अशा एकूण 348 मद्याच्या अनुज्ञप्तीवर सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी दिली.

अवैध मद्याबाबत तक्रारीसाठी 18002339999 टोल फ्री क्रमांक -
२८ - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात सहा गस्ती पथक कार्यरत असून, त्या पथकांच्याकडुन अवैध मद्यविक्री, अवैध वाहतुक व अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर बंद करण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दैनंदिन तसेच रात्री गस्त घालण्यात येते. विभागाकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्हा अन्वेषण कामकाजाची माहिती ईएसएमएस ॲपवर अद्ययावत करण्यात येते. अवैध मद्याबाबत तक्रार असल्यास संपर्क साधण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांकावर अथवा 8422001133 हा व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असल्याचे श्री.सत्यवान गवस निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क, तथा २८ - मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ संपर्क अधिकारी यांनी सांगितले.

नियंत्रण कक्ष कार्यान्वित -
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगरमध्ये २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नागरिकांना आणि उमेदवारांना निवडणुकीसंदर्भात काही माहिती अथवा सूचना असल्यास त्यांनी नियंत्रण कक्षात ०२२- २०८५२६८९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad