छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी फलाट क्र.१०-११ ची पर्याप्त लांबी वाढवणे आणि ठाणे स्थानकातील फलाट क्र. ५ चे रुंदीकरण करून अतिरिक्त जागा निर्माण करण्याचे काम ब्लॉक वेळेत करण्यात येईल. सीएसएमटीतील ३६ तासांच्या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
ठाणे स्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणासाठी ६३ तासांचा विशेष ब्लॉक मंजूर झाला आहे. साधारणपणे फलाट रुंदीकरणासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. अडीच दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी मॉड्यूलर फलाट उभारण्यात येणार आहे. यासाठी ४४ ओव्हरहेड वायरला आधार देणारे खांब योग्य ठिकाणी उभारण्यात आले आहेत. पहिल्या बारा ते पंधरा तासांत रुळ सरकवण्याची कामे करण्यात येतील. त्यानंतर ७२५ प्री-कास्ट बॉक्सच्या मदतीने मॉड्यूलर फलाट उभारण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेने सर्व आस्थापनांना विनंती केली आहे की या दिवशी प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांना घरून किंवा इतर कोणत्याही संभाव्य मार्गाने काम करण्याची संधी द्यावी. मध्य रेल्वेने प्रवाशांना या दिवसांत प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करावा असे आवाहन केले आहे.
असा असेल ब्लॉक -
ब्लॉक १ - ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक (डाऊन जलद मार्गिका)
ब्लॉक दिनांक आणि कालावधी: दि. ३० ते दि.३१.०५.२०२४ (गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री) ००.३० वाजता ते दि. ०२.०६.२०२४ (रविवार दुपारी) १५.३० वाजेपर्यंत = ६३ तास
ब्लॉक विभाग -
अप धीमी मार्गिका : कलवा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि क्रॉसओव्हर्ससह) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह)
डाऊन जलद मार्गिका: ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह) ते कळवा (सर्व क्रॉसओव्हर्ससह)
अप जलद मार्गिका: कलवा (सर्व क्रॉसओव्हर्ससह) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह)
ब्लॉक २ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक
ब्लॉक दिनांक: दि. ३१.५.२०२४ ते दि.०१.६.२०२४ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्री) च्या ००.३० वाजता ते दि. ०२.६.२०२४ (रविवार दुपारी) १२.३० वाजेपर्यंत - ३६ तास
ब्लॉकचा कालावधी:
डाऊन जलद मार्गिका : ००.३० वाजता (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते १५:३० वाजता (रविवार) ६३ तास
अप धीमी मार्गिका: ००.३० तास (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते १२:३० तास (शुक्रवार) १२ तास
ब्लॉक विभाग:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सहीत) आणि वडाळा रोड (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सह) आणि भायखळा (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (यासह) आणि भायखळा (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग
ब्लॉक दरम्यान उपनगरीय गाड्यांवर परिणाम
उपनगरीय सेवा रद्द -
ब्लॉक कालावधीत ९३० उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे रद्द केल्या जातील:
दि.३१.५.२०२४ (शुक्रवार) रोजी १६१ सेवा रद्द केल्या जातील.
दि.०१.६.२०२४ (शनिवार) रोजी ५३४ सेवा रद्द केल्या जातील.
दि.०२.६.२०२४ (रविवार) रोजी २३५ सेवा रद्द केल्या जातील.
उपनगरीय सेवा रद्द -
ब्लॉक कालावधीत ४४४ उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे रद्द केल्या जातील:
दि.३१.५.२०२४ (शुक्रवार) रोजी ७ सेवा रद्द केल्या जातील.
दि.०१.६.२०२४ (शनिवार) रोजी ३०६ सेवा रद्द केल्या जातील
दि.०२.६.२०२४ (रविवार) रोजी १३१ सेवा रद्द केल्या जातील.
उपनगरीय सेवा रद्द -
ब्लॉक कालावधीत ४४६ उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे कमी होतील:
दि. ०१.६.२०२४ (शनिवार) रोजी ३०७ सेवा रद्द केल्या जातील.
दि.०२.६.२०२४ (रविवार) रोजी १३९ सेवा रद्द केल्या जातील.
No comments:
Post a Comment