मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हला काल बुधवारी (दिनांक २२ मे २०२४) रात्री मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे निदर्शनास आले. बृहन्मुंबई महानगरपालिका जल अभियंता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कार्यरत राहून ही गळती थोपवून धरली आणि पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत केला आहे. त्यामुळे जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात आज गुरुवार, दिनांक २३ मे २०२४ रोजी दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. (Water supply cut for 3 hours on May 24 in Curry Road, Lower Parel area) (Mumbai Latest News)
रात्री १० वाजता हाती घेण्यात येणार -
मात्र, या गळती दुरुस्तीचे काम आज (दिनांक २३ मे २०२४) रात्री १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. सदर काम उद्या दुपारपर्यंत पूर्ण होईल .परिणामी, उद्या शुक्रवार, दिनांक २४ मे २०२४ रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाचा पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० दरम्यानचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
रात्री युद्ध पातळीवर काम हाती घेण्यात येणार -
रेसकोर्स आवारातील बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या टेलपीस सॉकेट जॉइंटमधून दिनांक २२ मे २०२४ रोजी रात्री मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे आढळले. खालच्या बाजूचा लीड जॉइंट पूर्णपणे बाहेर आल्याचे निदर्शनास आले. जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत त्याची पाहणी केली. सदर व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम आज दिनांक २३ मे २०२४ रोजी रात्री युद्ध पातळीवर हाती घेण्यात येत आहे. त्यापूर्वी, जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात आज दिनांक २३ मे २०२४ रोजी दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने होण्यासाठी व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार गळती दुरुस्तीचे काम आज दिनांक २३ मे २०२४ रोजी रात्री १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. पाण्याच्या उच्च दाबामुळे व्हॉल्वच्या सांध्यामध्ये शिसे (लीड जॉइंट) ओतणे शक्य नाही. त्यासाठी जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे. सदर काम उद्या दुपारपर्यंत पूर्ण होईल.परिणामी शुक्रवार, दिनांक २४ मे २०२४ रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ,डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाला पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या वेळेत नियमित दिला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment