एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 May 2024

एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद...


मुंबई - १ जानेवारी २०२४ पासून एसटीची ऑनलाईन आरक्षण प्रणाली (online reservation system) अदयावत करण्यात आली. या नव्याने सुरु करण्यात आलेल्या एसटीच्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत १२ लाख ९२ हजार तिकिटांची विक्री नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७५ हजार तिकीटांची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ३ लाखाने जास्त आहे. सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत.

प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अधिक़ृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईलवर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखिल प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारी, २०२४ पासून अमुलाग्र बदल करुन त्या अदयावत करण्यात आल्या. परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मुलन झाल्याने सदर ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे.

तक्रारी येथे दाखल करा -
या दोन्ही प्रणालीव्दारे प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे ‍ देखिल आगाऊ आरक्षण मिळु शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation ॲपच्या वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन केले आहे.
तथापी, ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. सदर नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन देखिल तिकीटे न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad