मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करीता 28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विक्रोळी येथील कार्यालयात १४ ते १६ मे या कालावधीत टपाली मतदान केंद्र कार्यरत असणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.
28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी विक्रोळी येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पिरोजशहा नगर, सांस्कृतिक सभागृह, स्टेशन साईड कॉलनी, गोदरेज कॉलनी, विक्रोळी स्टेशन जवळ, विक्रोळी पूर्व मुंबई ०७९ येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत टपाली मतदान केंद्र कार्यरत असणार आहे.
No comments:
Post a Comment