महायुतीच्या यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2024

महायुतीच्या यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट


मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यावर शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे-रिपाई महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakreay) यांची सदिच्छा भेट घेतली. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ निवासस्थानी मंगळवारी सकाळी झालेल्या भेटी दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव उपस्थित होते. (Mumbai News) 

मुंबई दक्षिणचे महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या सदिच्छा भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी यामिनी जाधव यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. सध्या तापमानाचा पारा चढता असताना प्रचारात स्वतः ची विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रचार करताना सोबत गार पाण्याची बाटली, आणि उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सोबत ओला रुमाल ठेवण्याचा मायेचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad