यामिनी जाधव या २०१२ साली मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी महापालिकेत विविध समित्यांवर काम केलं आणि आपली छाप उमटवली. भायखळा विधानसभा मतदारसंघ हा तसा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. या मतदार संघातून २०१९ मध्ये यामिनी जाधव या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर यामिनी जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ दिली होती. शिंदे गटात असलेल्या यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. एकेकाळी ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेल्या यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या त्या पत्नी आहेत. यामिनी जाधव यांनी गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका केली. आपण आजारी असताना उद्धव ठाकरे वा ठाकरे परिवारातील कोणीही आपली विचारपूस केली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. महायुतीने दाखवलेला विश्वास सार्थ करू अशी प्रतिक्रिया यामिनी जाधव यांनी दिली आहे.
१५ दिवासांपूर्वीच हा निर्णय -
मुंबईत तीन जागा भाजपने आणि तीन शिवसेनेने लढाव्या हा निर्णय आधीच झाला होता-फडणवीस हा निर्णय आधीच झाला होता मुंबईत तीन जागा भाजपने लढवावा आणि तीन जागा शिवसेनेने लढवा असा निर्णय १५ दिवासांपूर्वीच हा निर्णय झाला होता अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment