क्रेडिट कार्डच्या खर्चात २७ टक्के वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2024

क्रेडिट कार्डच्या खर्चात २७ टक्के वाढ


नवी दिल्ली - २०२३-२४ या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डचा खर्च वार्षिक आधारावर २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला तर एका वर्षापूर्वी तो सुमारे १४ लाख कोटी रुपये होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली.

मार्च २०२४ मध्ये क्रेडिट कार्डवरील खर्च १०.०७ टक्क्यांनी वाढून १.६४ लाख कोटी रुपये झाला आहे. मार्चमध्ये सणासुदीचा हंगाम आणि आर्थिक वर्ष संपल्यामुळे क्रेडिट कार्डवर जास्त खर्च झाला. फेब्रुवारी २०२४ मध्ये क्रेडिट कार्डचा खर्च १.४९ लाख कोटी रुपये होता. केअर एज रेटिंग्सचे सहाय्यक संचालक सौरभ भालेराव यांच्या म्हणण्यानुसार सणांचा हंगाम आणि आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने अनुक्रमे मार्चमध्ये अधिक व्यवहार झाले. क्रेडिट कार्डचा खर्च वाढतच राहील, असे त्यांचे मत आहे.

मार्च २०२४ मध्ये क्रेडिट कार्डवर एकूण १.६४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. या कालावधीत मार्च २०२४ मध्ये पॉईंट ऑफ सेल व्यवहार वाढून ६०,३७८ कोटी रुपये झाले तर फेब्रुवारीत या अंतर्गत व्यवहार ५४,४३१.४८ कोटी रुपये होते. ई-कॉमर्समधून पेमेंट फेब्रुवारीमध्ये ०.९५ लाख कोटी रुपयांवरून मार्चमध्ये १.०५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. कार्ड प्रमुखांमध्ये एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड व्यवहार फेब्रुवारीमध्ये ४०,२८८.५१ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्चमध्ये ८.५७ टक्क्यांनी वाढून ४३,४७१.२९ कोटी रुपये झाले. या कालावधीत अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवहार रु. १७५२८.९७ कोटींवरून ८.०५ टक्क्यांनी वाढून रु. १८,९४१.३१ कोटी झाले आहेत.

आयसीआयसीआयचाही क्रेडिट कार्ड व्यवहार वाढला -
आयसीआयसीआय क्रेडिट कार्डचे व्यवहार फेब्रुवारीत २६,८४३.०३ कोटी रुपयांवरून मार्चमध्ये १४.४९ टक्क्यांनी वाढून ३०,७३३.११ कोटी रुपये झाले. या कालावधीत एसबीआय कार्ड व्यवहार ७.३२ टक्क्यांनी वाढून २४,९४९.१७ कोटी रुपये झाले. मार्च २०२४ मध्ये बँकांनी जारी केलेल्या एकूण क्रेडिट कार्डांच्या संख्येत वाढ झाली आहे. मार्चपर्यंत जारी केलेल्या क्रेडिट कार्डांची एकूण संख्या १,०१० लाखांवर पोहोचली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad