देशात आता सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे (Loksabhaa Election 2024) वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. देशात सत्ताधारी आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्यात जागावाटपावरून वाटाघाटी चालू आहेत. विरोधी पक्षांनीही एकत्र येत भाजपविरोधात आघाडी स्थापन केली आहेत. अश्यातच, भाजपचे स्टार प्रहारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, (३१ मार्च) मेरठ येथे जाहीर साभार घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर टीका करत विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत,”भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असं वक्तव्यदेखील त्यांनी केले..मोदींच्या या वक्तव्यावर पलटवार करत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरपूस टीका केली आहे.
मोदी म्हणजे गुजरातचे जॉनी लिव्हर, संजय राऊतांची टीका -
संजय राऊत यांनी सोमवारी, (१ एप्रिल) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी मेरठ येथील भाजपाच्या जाहीर सभेत म्हणाले, भ्रष्टाचार्यांना आम्ही सोडणार नाही. मोदींनी हा सर्वात मोठा विनोद केला आहे. ते दररोज असे विनोद करतात. त्यांचे विनोद ऐकल्यानंतर वाटते कि देशात जॉनी लिव्हर नंतर कुणी मोठा विनोदी कलाकार असेल तर ते मोदीच आहेत. ते गुजरातचे लिव्हर असून आमचे मनोरंजन करत आहेत.”
पुढे ते म्हणाले, “त्यांच्या आजूबाजूला १० भ्रष्टाचारी बसले होते, जेव्हा मोदी म्हणाले की, आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही. दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षात दररोज सरासरी ५ भ्रष्टाचारी नेते प्रवेश करत आहेत. हे साधेसुधे भ्रष्टाचारी नाहीत तर कुख्यात भ्रष्टाचारी आहेत. एखादा कुख्यात गुंड असतो तसेच हे कुख्यात भ्रष्टाचारी आहेत. तुम्ही त्यांचं काय करणार?” असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
हिंमत असेल तर निवडणूक रोख्यांच्या प्रकरणावर मोदींनी बोलावं -
निवडणूक रोख्यांच्या प्रकरणावर (Electoral Bonds) भाष्य करत पुढे राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी अद्याप निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्याबाबत बोलले नाहीत. ते नेमका कोणता भ्रष्टाचार संपवणार आहेत? त्याबद्दल बोलले नाहीत. मी मोदींना आणि त्यांच्या पक्षाला आव्हान देतो की, हिंमत असेल तर निवडणूक रोख्यांच्या प्रकरणावर त्यांनी भाष्य करावं. निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा भाजपाने केलेला भ्रष्टाचार आहे की नाही हे त्यांनी सांगावं. भाजपाने जगाला मुर्ख बनवण्याची कामं बंद करावी.”
No comments:
Post a Comment