प्रकाशित फलकासाठी दिलेला परवानादेखील तत्काळ रद्द केला जाणार आहे. पालिकेच्या मराठी पाट्यांविरोधातील संथ कारवाईवर बातमी दिली गेली होती. त्याची दखल घेत मराठी भाषेत, देवनागरी लिपीत असणारे फलक त्यांनी लावावेत, त्यासाठी नव्याने प्रकाशित फलकांची नोंदणी करावी, अशा सूचना पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिका-यांना दिल्या.
वारंवार सवलत देऊनदेखील, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच अधिनियम यांचे पालन न करणा-या दुकाने व आस्थापनांवर आता सक्त कारवाई करावी लागेल, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. या पार्श्वभूमीवर मराठी पाट्या न लावणा-या दुकानदारांना १ मेपासून दुप्पट मालमत्ता कर आकारण्यात यावा व त्यासाठी योग्य ती प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यास सांगितले. ग्लो साईन बोर्डसाठी पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून परवाने दिले जातात, असे परवानेदेखील मराठी फलक नसलेल्या दुकाने व आस्थापनांच्या बाबतीत तत्काळ प्रभावाने रद्द करून त्यांची सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्याच्या सूचना दिल्या.
किमान २५ हजारांचा दंड -
फलक परवाना रद्द झाला तर परवाना मिळविणे, फलक तयार करणे अशा गोष्टी लक्षात घेता दुकानदारांना किमान २५ हजार रुपयांपासून ते तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत खर्चाचा भुर्दंड बसणार आहे. वारंवार मुभा देऊनही अधिनियम व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळणा-यांवर महापालिका प्रशासनाने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
कठोर कारवाई का? -
न्यायालयाच्या सूचनेनंतर पालिकेने कारवाई आधी मुदत देऊनही दुकाने, आस्थापनांवर मराठी पाट्या दिसत नाहीत. कारवाई थंडावल्याचे दिसून आले असून न्यायालयाच्या सूचनेचे पालन करण्याच्या दृष्टीने मराठी पाट्यांची अंमलबजावणी आवश्यक असल्याने आयुक्तांनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment