मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयातील कामगारांना निवडणूक कामासाठी नियुक्त केले जाते. याच अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागात काम करणाऱ्या 'चावीवाला' पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. चावीवाल्यांना निवडणुकीच्या कामावर रुजू करून घेतल्यास शहरातील पाणीपुरवठ्यासंदर्भात मोठा प्रश्न उभा राहणार आहे. (Mumbai latest News)
मुंबई शहरात 20 मे रोजी सह मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्यासाठी कैक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी म्हणून सज्ज असणाऱ्या तानसा, मोडकसागर, भातसा, तुळशी, विहार, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा अशा धरणांमधून वेगवेगळ्या वेळांना साधारण दर दिवशी 3950 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तीन पाळ्यांमध्ये काम करणारे पाणीपुरवठा विभागातील 'चावीवाला' कर्मचारी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि अगदी सहजपणे शहरातील असंख्य घरांमध्ये असणाऱ्या नळांना, विविध उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो.
निर्धारित वेळेत शहरातील विविध विभागांना पाणीपुरवठा सुरू करून तो बंद करणं, चावी नेमकी कशी आणि कितीवेळा फिरवावी, पाण्याचा दाब नियंत्रीत कसा करावा अशा अनेक गोष्टींची काळजी या कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते. या कामात कमालीच्या सुसूत्रतेची गरज असते, अन्यथा एक लहानशी चूक शहरातील पाणीपुरवठ्याचं गणित बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. प्रत्यक्षातच या विभागातील कर्मचाऱी क्षमतेहून कमी संख्येनं सेवेत आहेत त्यातच आता कामावर रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठीचे आदेश दिल्यास शहरातील पाणीपुरवठा गडबडण्याची किंवा ठप्प होण्याचीच भीती व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment