Mega Block - रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 April 2024

Mega Block - रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक


मुंबई - रेल्वेच्या रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ७ मार्च २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी- नेरुळ तर पश्चिम रेल्वेवर माहीम ते अंधेरी मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai Local News)

मध्य रेल्वे -
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव दरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि अप- डाऊन मार्गावरील लोकल सेवा आपल्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.

ट्रान्स-हार्बर -
ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११. १० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे -
पश्चिम रेल्वेवर माहीम ते अंधेरी मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान माहिम ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप-डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत ब्लॉक राहणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-बांद्रा,गोरेगाव दरम्यानची लोकल वाहतूक पुर्णपणे बंद राहणार आहे. तसेच चर्चगेट ते गोरेगाव लोकल सेवा देखील बंद राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad