मुंबई - मोठे स्तन हा अनेक महिलांसाठी मनस्तापाचा विषय (Women Breast Size) ठरतो आहे. अनेक महिलांना मोठ्या स्तनामुळे शारीरिक हालचालींवर मर्यादांचा सामना कराव लागतो आहे, तर काही महिलांना समाज घटकांकडून अपमानास्पद टिप्पणींचा सामना करावा लागतो आहे. परिणामी स्तनांचा आकार (Breast Size) कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण भारतात वाढत आहे. अर्थात हे प्रमाण नक्की किती टक्क्यांनी वाढते आहे, याबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, डॉक्टर सांगतात ही हे प्रमाण भारतामध्ये जवळपास 100% इतके आहे. ( Breast Reduction Surgery) (Marathi Latest News)
भारतीय महिलांमध्ये स्तन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेच्या वाढीच्या कारणांचा शोध घेताना काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. खास करुन अलिकडील काही वर्षांमध्ये या शस्त्रक्रियांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने सामाजिक आणि वैद्यकीय पातळीवरही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये उत्सुकता आणि चर्चांचे प्रमाण दिसते. मात्र, महिलांच्या समस्या आणि त्यांवरील अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये आणि वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांना जी कारणे सापडतात ती काहीशी वेगळी आणि सर्वसमावेशक आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे. नवी दिल्लीतील डिव्हाईन कॉस्मेटिक सर्जरीचे प्लास्टिक सर्जन डॉ अमित गुप्ता (Dr Amit Gupta) यांच्या हवाल्याे इंडिया टुडेने अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या एका लेखात या कारणांचा विशेष उल्लेख आहे.
पाश्चात्य फॅशनचा प्रभाव -
पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या कपड्यांच्या शैलीतील विकसित होणारी प्राधान्ये स्तन कमी करण्याच्या शस्त्रक्रियांची मागणी वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉ. गुप्ता सांगतात भारती महिला पारंपारिक पोशाखाकडून टी-शर्टसारख्या घट्ट पाश्चात्य कपड्यांकड्यांना अलिकडे प्राधान्य देऊ लागल्या आहेत. हे कपडे विशिष्ठ बनावटीचे असतात. त्यामुळे भारतीय महिलांसाठी ते तितके आरामदाई असत नाहीत. परिणामी हे कपडे परिधान करण्यासाठी स्तनांचा अडसर ठरु शकतो. ज्यामुळे अनेकदा अस्वस्थता आणि शारीरिक ताण येतो. त्यामुळेही महिलांचा कल स्थन कमी करणाऱ्या शस्त्रक्रियेकडे वाढू लागला आहे.
आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वायत्तता -
बदलत्या सामाजिक गतिशीलतेमुळे महिलांना अलिकडील काही वर्षांमध्ये त्यांच्या निर्णयांवर अधिक आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वायत्तता मिळते. पाठिमागच्या काही वर्षांमध्ये ही मुभा नव्हती. त्यामुळे या महिला पालक किंवा जोडीदारावरील अवलंबित्व यामुळे परावलंबी होत्या. त्यामुळे अनेकदा स्त्रियांना इच्छा असूनही शस्त्रक्रिया करण्यात अडथळा येत असे. आता, आर्थिक स्थैर्याने सशक्त, महिला शारीरिक अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्तन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया सक्रियपणे करतात.
शारीरिक मर्यादा दूर करणे -
स्तन कमी करण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये केवळ सामाजिक कारणेच नाहीत. त्यामागे काही शारीरिक कारणेही आहेत. जसे की, शारीरिक हालचालींवर मर्यादा, कामाचे, व्यवसायाचे स्वरुप, स्तनपान, आजार यांसारखी इतरही काही विविध कारणे आहेत. त्यामुळे शारीरिक मर्यादा दूर करण्यासाठीही महिलांमध्ये हे प्रमाण वाढते आहे.
निवडीच्या माध्यमातून सक्षमीकरण -
थोडक्यात, स्तन कमी करण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये होणारी वाढ हे भारतीय महिलांमधील सक्षमीकरण आणि स्वत:ची काळजी घेण्याकडे व्यापक सांस्कृतिक बदलाचे प्रतीक आहे. सामाजिक दबाव आणि डिजिटल प्रभाव, सौंदर्य, आदर्शांना आकार देत असताना, स्त्रिया त्यांच्या शरीराची मालकी पुन्हा मिळवत आहेत. महिला सौंदर्याचे विविध मानकंही स्वीकारत आहेत. शेवटी, वेगाने विकसित होत असलेल्या जगात शारीरिक आराम, आत्मविश्वास आणि आत्म-अभिव्यक्ती शोधणाऱ्या स्त्रियांसाठी स्तन कमी करण्याची शस्त्रक्रिया एक परिवर्तनकारी पर्याय म्हणून उदयास आली आहे.

No comments:
Post a Comment