मोदींनी दहा वर्षांत काय केले ते सांगा - प्रियंका गांधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 April 2024

मोदींनी दहा वर्षांत काय केले ते सांगा - प्रियंका गांधी


उदगीर - बेरोजगारीच नव्हे तर महागाई खूप वाढली आहे. तुम्ही समाजाचा बोजा उचलता. तुम्हाला संसार सांभाळावा लागतो. तुम्ही नोकरी करता, शेती करता. समाजात किंवा कुटुंबात संकट आले तर तुम्ही त्याग करता. तुम्ही बचत केलेल्या पैशातून काही ना काही खरेदी करता. पण या सरकारने महागाई इतकी करून ठेवलीय की तुम्हाला या गोष्टी घेणेही कठिण जात असल्याचा आरोप काँग्रेस (Comgress) नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे केला. (Marathi Latest News)

प्रियंका गांधी आज लातूरच्या उदगीरमध्ये आल्या होत्या. प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे देशात सरकार आले. गेल्या दहा वर्षात या सरकारने काय केले? त्यांनी रोजगार तर दिलेच नाही, पण रोजगार घटवले आहेत. पाच किलो राशन दिले. चांगले झाले. पण या पाच किलो रेशनमध्ये तुमच्या मुलांचे भविष्य घडवले जाणार आहे का? असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे. मोदींना वाटते पाच किलो राशन दिले म्हणजे सर्व काही झाले. एवढंच पुरेसे आहे. पाच किलो राशनमध्ये तुमचे काय होणार आहे? असा सवालही त्यांनी केला.

१२०० रुपये तुम्ही गॅस सिलिंडरला मोजत होता. निवडणूक आल्यावर मोदी म्हणाले, ४०० रुपये सिलिंडर देणार. निवडणुका पाहून त्यांनी हा निर्णय घेतला. गेल्या दहा वर्षापासून यांचं केंद्रात सरकार आहे. एवढ्या वर्षात गॅस महागडा केला. आता कमी केला. याचा अर्थ काय? तुम्हाला बेरोजगार ठेवले आणि पाच किलोचे राशन देण्याची मेहरबानी केली. शेतकरी आत्महत्या करत आहे. सोयाबीनच्या शेतक-यांची परिस्थिती खालावली आहे असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

दहा वर्षात रोजगार बंद -
गेल्या दहा वर्षात यांनी रोजगार बंद केले. चुटकी वाजवून काय केले? रोजगार निर्माण केले नाही. महागाई कमी केली नाही. महिलांसाठी काहीच केलं नाही. जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे. तिथे महिलांना पैसे दिले जात आहे. कर्नाटकात गरीब कुटुंबातील महिलांना दोन हजार रुपये मिळत आहेत, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.

७० लाख पदे रिक्त -
काँग्रेसने या ठिकाणी खूप विकास केला. मोठ्या फॅक्ट्री तयार झाल्या त्या केवळ काँग्रेसमुळे. तुमच्याशी मला गंभीर गोष्टी बोलायच्या आहेत. तुम्ही गांभीर्याने विचार करा. आपला देश कुठे आहे हे पाहा. आज देशात सर्वाधिक बेरोजगारी आहे. ४५ वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी आहे. केंद्रात ३० लाख पद खाली आहे. पण भरले नाही. ७० लाख लोक बेरोजगार आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही अनेक समस्यांचा सामना केला आहे. मोदी सरकार पद भरत नाही, असा आरोप त्यांनी केला.

१५ लाख खात्यात आले का? -
मोदी सरकारने अब्जाधीशांना १६ लाख कोटी रुपयांची कर्ज माफी दिली. शेतक-यांना काय केले? या देशातील शेतक-यांना जीएसटी दिली. शेतकरी दिल्ली आंदोलनात मेले. ६०० शेतकरी मेले, पण मोदी घराच्या बाहेर आले नाही. निवडणुका आल्यावर नौटंकी सुरू होते. मोठमोठी आश्वासन दिले जातात. कुणाच्या खात्यात १५ लाख आले का सांगा? असा सवाल त्यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad