प्रकाश आंबेडकर हे धूर्त राजकारणी - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2024

प्रकाश आंबेडकर हे धूर्त राजकारणी - रामदास आठवले

 



मुंबई - ''प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्याचा मला आदर आहे. आंबेडकर हे धूर्त राजकारणी आहेत. आंबेडकर हे निवडणूकीच्या काळामध्ये चांगला खेळ खेळण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट आहेत. हे मला जमत नाही. त्यांना जे जमतं ते मला जमत नाही आणि मला जे जमतं ते त्यांना जमत नाही'', असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'ने आयोजित केलेल्या 'मटा कॅफे'मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ''आंबेडकर वेगळे असले तरी आमच्यात एक गोष्ट चांगली आहे. जशी महायुती आणि महाविकास आघाडी हे एकमेकांवर एवढे आरोप करतात. आमच्यामध्ये आम्ही एवढे आरोप-प्रत्यारोप करत नाहीत. मी कधीही प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलत नाहीय. त्यामुळे त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आहे. पण त्यांना मविआमध्ये घेतलं गेलं नाही. त्यांनी मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहून सांगितलं होतं की, मला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे. तरीही मविआने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे'', असंही आठवले यांनी कॅफेत सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad