ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणखी ४ उमेदवार जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 April 2024

ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणखी ४ उमेदवार जाहीर


मुंबई - उद्धव ठाकरेंनी कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना त्यांनी एकूण चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली. (4 more candidates announced by Thackeray's Shiv Sena)

पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कांबळी, जळगावमधून करण पवार आणि हातकणंगलेतून सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याआधी शिवसेनेने १७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत (३ एप्रिल) उद्धव ठाकरे यांनी ४८ पैकी २२ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

पहिली यादी जाहीर करताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. १६ जणांची नावं असलेली यादी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात एकूण २२ जागांवार लोकसभा निवडणूक लढणार आहे. उरलेल्या ५ जागा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. पालघर, कल्याण, उत्तर मुंबई यासारख्या जागांचा त्यात समावेश आहे. तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी पाठिंबा मागतायत. सध्या ती जागा शिवसेनेकडे आहे त्याबाबत लवकरच निर्णय होईल.

काँग्रेसकडून सांगलीसाठी उमेदवार जाहीर केला जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधी म्हटले होते. पण तिथून ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ठाण्यातून राजन विचारे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, परभणीतून संजय जाधव, उस्मानाबाद (धाराशिव)मधून ओमराजे निंबाळकर, सिंधुदुर्गमधून विनायक राऊत या खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad