मुंबई - मालाड पिंपरीपाडा येथील ड्रेनेज लाईंनचे काम (Sewer cleaning work) खासगी सफाई कामगारांकडून केले जात होते. या कामा दरम्यान 3 कामगार ड्रेनेज लाईंनमध्ये अडकले (Stranded in drainage) होते. त्यांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यामधील 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एका कामगाराची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Mumbai Latest News) (Marathi Latest News)
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज 24 एप्रिल रोजी दुपारी 3.50 वाजता मालाड पूर्व पिंपरीपाडा येथील रहेजा टॉवरमधील ड्रेनेज लाईंनचे कामकाज सुरू होते. त्यासाठी खासगी सफाई कामगारांना बोलावण्यात आले होते. ड्रेनेज लाईंनची सफाई सुरू असताना 3 कामगार ड्रेनेज लाईंनमध्ये अडकले. या कामगारांना बाहेर काढून जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामधील रघु सोलंकी वय 50, जावेद शेख 36 वर्षे या दोघांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर अकिब शेख 19 वर्षे याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment