भारतातील तरुणांच्या बेरोजगारीचा दर जगात सर्वाधिक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 March 2024

भारतातील तरुणांच्या बेरोजगारीचा दर जगात सर्वाधिक

 


नवी दिल्ली - भारतातील सुशिक्षित तरुणांमधील बेरोजगारीचा दर अशिक्षित तरुणांपेक्षा जास्त आहे. उच्च शिक्षणामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. एक प्रमुख कारण म्हणजे शिक्षित लोक अनौपचारिक काम स्वीकारण्याची शक्यता कमी असते, असे आंतराष्ट्रीय कामगार संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारतातील सुशिक्षित बेरोजगारीचा दर उच्चांकी असून तरुण बेरोजगारीचा दर जगात सर्वाधिक आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. परंतु या तरुणांच्याच हाताला काम नसल्याने जागतिक स्तरावरून चिंता व्यक्त केली जात आहे.

भारतात पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर २९.१ टक्के तर ज्यांना वाचता आणि लिहिता येत नाही, त्यांचा दर ३.४ टक्के आहे. माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी बेरोजगारीचा दर १८.४ टक्के आहे. भारतातील बेरोजगारी ही प्रामुख्याने तरुणांमध्ये, विशेषत: माध्यमिक स्तरावरील किंवा उच्च शिक्षण असलेल्या तरुणांची समस्या होती आणि ती कालांतराने तीव्र होत गेली. भारतातील तरुण बेरोजगारीचा दर आता जागतिक स्तरापेक्षा जास्त आहे, असेदेखील आंतराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हटले आहे.

या आकडेवारीनुसार तरुणांची कौशल्ये बाजारात निर्माण होत असलेल्या नोक-यांशी जुळत नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासारख्या नामवंत अर्थतज्ज्ञांनीही याबाबत इशारा दिला होता. त्यांच्या चेतावणीने अधोरेखित केले की, भारताचे खराब शालेय शिक्षण कालांतराने त्याच्या आर्थिक संभावनांना अडथळा आणेल. तशी परिस्थिती आता दिसायला सुरुवात झाली आहे. आता केंद्र सरकारने शालेय धोरणात बदल केला आहे. परंतु या नव्या धोरणावरही टीकास्त्र सोडले जात आहे. चीनमध्ये १६-२४ वयोगटातील तरुणांचा बेरोजगारीचा दर वर्षाच्या पहिल्या २ महिन्यांत १५.३ टक्क्यांपर्यंत वाढला. जो शहरी लोकसंख्येच्या ५.३ टक्के दरापेक्षा जवळजवळ तीनपट जास्त आहे. १५-२९ वयोगटातील तरुण बेरोजगार भारतीयांचा इ. स. २००० मधील वाटा ८८.६ टक्क्यांवरून २०२२ मध्ये ८२.०९ टक्क्यांपर्यंत घसरला तर सुशिक्षित तरुणांचा वाटा या कालावधीत ५४.२ टक्क्यांवरून ६५.७ टक्क्यांपर्यंत वाढला.

शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारी अधिक -
बेरोजगार तरुणांमध्ये महिलांचा वाटा ७६.७ टक्के आहे, तर पुरुषांचा वाटा ६२.२ टक्के आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातही बेरोजगारी जास्त होती. भारतातील महिला श्रमशक्तीचा सहभाग दर जगातील सर्वात कमी म्हणजे सुमारे २५ टक्के आहे. यावरून असे दिसून येते की, भारतातील बेरोजगारीची समस्या तरुणांमध्ये, विशेषत: शहरी भागातील शिक्षित लोकांमध्ये अधिक प्रमाणात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad