निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिले का ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 March 2024

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिले का ?


मुंबई - लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण देण्यात आले का? या जनहित याचिकेवरील आरोपांबाबत राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. येत्या चार आठवड्यात सर्व प्रतिवादींनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे हायकोर्टाने म्हटले आहे.

भाऊसाहेब पवार यांनी यासंदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. यात त्यांनी आरोप केला की, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने १० टक्के मराठा आरक्षण लागू केले आहे. हे आरक्षण समाजातील एकता, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी याच्याविरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधातील हे १० टक्के मराठा आरक्षण असल्याचेही त्यांनी या जनहित याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यानंतर आता सहा आठवड्यांसाठी ही सुनावणी तहकूब करण्यात आली. दरम्यान, चार आठवड्यात या याचिकेतील सर्व प्रतिवादींनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad