मुंबई - शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने तसेच भाजपाने राज्यात निवडणूक प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ४० नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे.
शिवसेना स्टार प्रचारक -
या यादीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना नेते गजानन किर्तीकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या मीना कांबळी, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री दिपक केसरकर, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय राठोड, आमदार भारत गोगावले, माजी मंत्री दिपक सावंत, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार मनिषा कायंदे, मुख्य समन्वयक नरेश म्हस्के, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, प्रवक्ते राहुल लोंढे, उपनेते कृपाल तुमाने, आमदार आशिष जैयस्वाल, पूर्व विदर्भातील शिवसेना संघटक किरण पांडव हे नेते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भाजपचे स्टार प्रचारक -
नरेंद्र मोदी, जगतप्रकाश नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भूपेंद्रभाई पटेल , विष्णूदेव साय, मोहन यादव, भजनलाल शर्मा, रामदास आठवले, नारायण राणे, अनुरागठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे पाटील, शिवराज सिंह चौहान, सम्राट चौधरी, अशोक चव्हाण, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, पीयूष गोयल, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, के. अण्णामलई, मनोज तिवारी, रवी किशन, अमर साबळे, विजयकुमार गावित, अतुल सावे, धनंजय महाडिक.
No comments:
Post a Comment