कोरोनाच्या काळात व्हॅक्सिन कंपनीकडून मोदींनी पैसे उकळले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2024

कोरोनाच्या काळात व्हॅक्सिन कंपनीकडून मोदींनी पैसे उकळले



ठाणे - देशावर कोरोनाचे महासंकट आले, त्यावेळी या महामारीत ५० लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला. त्यामुळे संपूर्ण देशात भीतीच्या सावटाखाली वावरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅक्सीन कंपनीच्या माध्यमातून पैसे उकळत होते, असा गंभीर आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. ठाण्यात नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. आज लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. तत्पूर्वी आज ते ठाण्यात जांभळी नाका येथे आयोजित सभेत राहुल गांधी नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी राहुल गांधी यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून २४ तसा जनेतची लूट करीत आहेत. एकीकडे देशात मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरही खंडणी सत्र सुरू केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॅक्सीन कंपनीकडून पैसे उकळत असताना जनतेला त्यांनी थाळी वाजविण्यात गुंतून ठेवले. याबाबत कुणी बोलले किंवा विरोध केला, तर त्यांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ईडी, आयकर विभागाच्या चौकशा लावत आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. आम्ही भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रेच्या माध्यमातून देशाला जोडण्याचे काम करीत आहोत, दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील लोकांमध्ये भांडण लावत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेचा पैसा गोळा केला आहे. अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या सोहळ््याच्या वेळी कोणताही शेतकरी, गरीब, आदिवासी बांधव तिथे दिसले नाही, तेथे फक्त अंबानी आणि अदानी यांच्यासह अरब लोक दिसले. असे सांगत नफरत के बाजार मे आप लोगो ने मोहब्बत की दुकान खोली असे राहुल गांधी म्हणाले.

ईडी, सीबीआयची भीती दाखवून खंडणी उकळली - 
केंद्र सरकार सातत्याने ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांच्या माध्यमातून कंपन्याना कारवाईची भीती दाखवली जात आहे आणि त्यांच्यावर दबाव टाकून कंपन्याकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजप खंडणी उखळत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. बांधकाम तसेच इतर अशी मोठी कंत्राटे ज्या कंपन्याना देण्यात आली, त्यांच्याकडूनही निवडणूक रोखे स्वरूपात हफ्ते घेण्यात आले आल्याचा आरोपही त्यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad