नवी दिल्ली / मुंबई - लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने सामान्यांसाठी एक दिलासादायक घोषणा केली असून, पेट्रोल आणि डिजेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिजेलचे दर २ रुपयांनी कमी करण्यात आले. नवे दर शुक्रवार, दि. १५ मार्चपासून लागू होणार आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी माहिती दिली. (Petrol diesel cheaper)
सरकारने शुक्रवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री पुरी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती २ रुपयांनी कमी करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे नेहमीच ध्येय असते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, असे आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले.
त्यानुसार भारताची आर्थिक राजधानी, मुंबई, जिथे व्हॅट आणि इतर करांमुळे इंधन दिल्लीच्या तुलनेत अधिक महाग होते. तिथे किंमत २.१० रुपयाने कमी केली आहे. मुंबईतील पेट्रोलची सध्याची किंमत १०६.३१ रुपये आहे. आता ही किंमत १०४.२१ रुपये होईल. तसे मुंबईत डिझेलची प्रतिलिटर किंमत ९४.२७ रुपये आहे. ही किंमत ९२.१५ रुपये होईल.
No comments:
Post a Comment