मुंबई / पालघर - लोकसभा निवडणूक जाहीर होताच निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधींना बदलून नव्या प्रतिनिधींना संधी देण्याची मागणी अनेक मतदारसंघातून केली जात आहे. अशीच मागणी पालघरमधून झाली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचे पालघरचे पदाधिकारी डॉ. विश्वास वळवी यांनी विरोध केला आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्षातील जागावाटप निश्चित झाले नसल्याने जागावाटपाचा संभ्रम कायम राहिला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊ नये यासाठी स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि भाजपचा याला विरोध आहे. त्यात शिवसेनेचे पालघरचे पदाधिकारी डॉ. विश्वास वळवी यांनी देखील गावित यांच्या उमेदवारीला विरोध केलाय, आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मुख्यमंत्री आणि पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. अन्यथा कार्यकर्त्यांशी बोलून आपण योग्य तो निर्णय घेऊ असा इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment