मुंबई - महाराष्ट्राचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे एक एक कारनामे उघड होत आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या निनावी पत्रात असा दावा करण्यात आला आहे की राज्यपाल असलेल्या कोश्यारीच्या शिक्षण संस्थेने अनंत अंबानी यांच्याकडून १५ कोटी रुपयांची देणगी घेतली आहे. अनिल गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवून चौकशीची मागणी केली आहे. (Koshyari received a donation of Rs 15 crore from Ambani)
भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या पदाचा उपयोग करून उत्तराखंडमधील एका शाळेच्या नावाने भरपूर देणग्या गोळा केल्या आहेत. विशेष म्हणजे या शाळेत १०० मुलेही शिकत नाहीत, अशा शाळेकरिता कोट्यावधीच्या देणग्या गोळा केल्या आहेत. त्या पैशातून आपला पुतण्या दीपेंद्र सिंग कोश्यारी याच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमीन खरेदी करून तिथे रिसोर्ट चालू केले आहे. अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी १५ कोटी रुपये घेतले आहेत. शेर सिंग कार्की सरस्वती विहार, डिगरा मुवानी, चामू, कनालीछीना, पिथौरागढ उत्तराखंड देवस्थळी यांच्या नावाने भरपूर संपत्ती गोळा केली आहे. Devbhumi Shiksha Prasar Samiti, Nainital Bank Haldwani Branch, Account No-0561000000000310 या बँक खात्यामधून देणगी देण्यात आली आहे. याशिवाय SBI मधील एका खात्यातही अनेक व्यवहार केले गेले आहेत. २०१९ पूर्वी सस्थांना किती देणग्या मिळाल्या आणि २००९ ते २०२३ या कालावधीत किती देणग्या मिळाल्या याची तुलना सहज करता येऊ शकते असे गलगली यांनी म्हटले आहे.
अनिल गलगली यांनी यापूर्वी आरटीआयद्वारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या संस्थेने जमा केलेल्या देणग्यांबाबत माहिती मागवली होती. आता या प्रकरणाची चौकशी झाली तर सर्व सत्य बाहेर येईल, अशी मागणी गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
No comments:
Post a Comment