नाशिकमध्ये गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला आग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2024

नाशिकमध्ये गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला आग


नाशिक- मुंबईहून गोरखपूरकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग लागली. नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. डब्यातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यामुळे प्रवाशांची पळापळ झाली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ आज शुक्रवारी गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली. ही एक्स्प्रेस मुंबईहून गोरखपूरकडे जात होती. नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली. आगीच्या घटनेनंतर एक्स्प्रेस थांबवण्यात आली. आग लागल्याने एक्स्प्रेस थांबवल्याचे समजताच प्रवाशांची धावपळ उडाली. नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली. आगीच्या घटनेनंतर एक्स्प्रेस थांबवण्यात आली.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच प्रवासी आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येने जमले होते. डब्यातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे एक्स्प्रेसमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते. ही आग पार्सल बोगीला लागली होती. या डब्यात लाखो रुपये किंमतीचा माल होता. तो संपूर्ण जळून खाक झाला आहे. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. नाशिकरोड पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad