Mumbai News - मुंबईत या विभागात १०० टक्के पाणीपुरवठा बंद ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 February 2024

Mumbai News - मुंबईत या विभागात १०० टक्के पाणीपुरवठा बंद !


मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील उदंचन केंद्रात संयंत्राला आज २६ फेब्रुवारी २०२४ आग लागली. आगीमुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बाधित झाला आहे. मुंबईमधील काही भागांत १०० टक्के तर काही भागांत ३० टक्के पाणीपुरवठा बंद (Water Cut in mumbai) राहणार असल्याने पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे नागरिकांना आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागण्याची घटना आज (दिनांक २६ फेब्रुवारी २०२४) उद्भवली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरिय जलाशय, ट्रॉम्बे उच्चस्तरिय जलाशय, घाटकोपर निम्नस्तरिय जलाशय तसेच शहर विभागातील एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग, गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा आज मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील. तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच उर्वरित शहर विभाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा ३० टक्क्यांनी कपात करण्यात येत आहे. सबब, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

१०० टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग - 
टी विभाग (पूर्व आणि पश्चिम), एस विभाग (नाहूर पूर्व, भांडुप पूर्व, विक्रोळी पूर्व), एन विभाग (विक्रोळी पूर्व, घाटकोपर पूर्व, सर्वोदय नगर, नारायण नगर), एम पूर्व व एम पश्चिम संपूर्ण विभाग, एफ दक्षिण व एफ उत्तर संपूर्ण विभाग, भंडारवाडा जलाशयातून पाणीपुरवठा होणारा ई, बी आणि ए विभाग.

३० टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग -  
उर्वरित महानगरपालिकेतील विभाग, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर विभाग.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad