Mumbai News - बेस्टचे दोन वर्षात १५७ अपघात, ४१ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 February 2024

Mumbai News - बेस्टचे दोन वर्षात १५७ अपघात, ४१ जणांचा मृत्यू


मुंबई - मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन म्हणून बेस्ट बसला ओळखले जाते.  सुरक्षित प्रवासासाठी बेस्ट बसला प्रवासी पसंती देतात. परंतु हीच दुसरी लाइफलाईन प्रवासी व पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२४ या दोन वर्षांत बेस्टच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसेसचे १५८ अपघात झाले. या अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाला असून १४१ जण जखमी झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

मुंबईकरांची पहिली लाइफलाईन असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत रोज १० जणांचा अपघात होत असून वर्षाला ४ हजार प्रवाशांना रूळ ओलांडताना जीव गमवावा लागतो. गेल्या दोन वर्षांत बेस्ट बसेसच्या १५८ अपघातांत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १४१ जण जखमी झाल्याचे बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. बेस्ट उपक्रमाच्या प्रचलित पद्धतीनुसार मोटार अपघात दावा न्यायाधिकरण येथे दाखल करण्यात येतो. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये न्यायाधिकरणाने दिलेल्या निवाड्यानुसार व राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सुमेटाने निकाली काढण्यात आलेल्या एकूण १२ प्रकरणांत जखमींना ९ कोटी ७८ लाग २२ हजार ९७६ रुपये व एकूण ५३ प्रकरणांमध्ये मृतांच्या कायदेशीर वारसांना ११ कोटी २२ लाख ६८ हजार ५६६ रुपये इतकी नुकसानभरपाई देण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

दादर टीटी खोदादाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्विनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डम्परला मागून धडक दिल्याची घटना २ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी चालकाच्या मृत्यूसह ३ जणांचा मृत्यू, तर ८ जखमी झाले होते. तर भांडुप येथे ११ ऑगस्ट २०२१ रोजी बेस्ट बस इलेक्ट्रिक कॅबिनवर धडकली होती. या दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू तर दोन जखमी झाले होते. २२ जून २०२३ रोजी गिरगाव येथे बेस्ट बसला झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad