जामनेरमध्ये भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 February 2024

जामनेरमध्ये भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ'


जामनेर - सध्या युवा पिढीमध्ये वाढत चाललेल्या उत्तेजक द्रव्य सेवनाचे फॅड रोखण्यासाठी आणि तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवत ग्रामविकास, पर्यटन मंत्री, आमदार गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे 'नमो कुस्ती महाकुंभ' या भारतातील सर्वात मोठ्या कुस्ती दंगलचे आयोजन केले आहे. ही कुस्ती दंगल जामनेरच्या गोविंद महाराज क्रीडांगणावर खेळवली जाणार आहे.

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विरुद्ध जम्मू केसरी मुस्तफा खान अशा एकापेक्षा एक अशा १३ कुस्ती दंगली आणि त्याचबरोबर खानदेश आणि परिसरातील १०० पेक्षा अधिक पैलवानांचे द्वंद्व पाहाण्याचे भाग्य येत्या ११ फेब्रूवारीला जामनेरकरांना लाभणार आहे. निमित्त आहे नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा हा मंत्र भारतातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे. 

जे आजवर कुणालाही जमले नाही, असे भव्य आणि दिव्य आयोजन जामनेरमध्ये केले जाणार आहे. ही एकदिवसीय कुस्ती दंगल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लढतींमुळे कुस्तीप्रेमींच्या स्मरणात राहिल, असे दिमाखदार आयोजन ११ फेब्रूवारी, रविवारी केले जाणार आहे. कुस्ती जगतातील रथी-महारथी एकाच वेळी एका मंचावर आणण्याचा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून रचला जाणार आहे. या एकदिवसीय दंगलीमध्ये राज्यातील पैलवानांसह हिंदुस्थानच्या कुस्ती क्षेत्रातील दिग्गजही आपला जोर दाखवण्यासाठी सध्या अखाड्यांमध्ये आपला घाम गाळत आहेत.

या दंगलीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख भारत केसरी  बिनिया मिनला आव्हान देणार आहे. तसेच महेंद्र गायकवाड (उप महाराष्ट्र केसरी) वि. मनजीत खत्री (भारत केसरी), विजय चौधरी (ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. मुस्तफा खान (शेर ए हिन्द), प्रकाश बनकर (उप महाराष्ट्र केसरी) वि. भूपिंदर सिंह (भारत केसरी), किरण भगत (उप महाराष्ट्र केसरी) वि. गुरुजनट सिंह (पंजाब केसरी), बालारफिक केसरी (महाराष्ट्र केसरी) वि. मनप्रीत सिंग (पंजाब केसरी), अजय गुज्जर (भारत केसरी) वि. माउली कोकाटे (उप महाराषट्र केसरी), सुमित मलिक (अर्जुन अवॉर्ड, हिंदकेसरी) वि.हॅपी सिंह (पंजाब केसरी), प्रितपाल सिंग वि. शंटी कुमार(दिल्ली केसरी), समीर शेख (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. कलवा गुज्जर (भारत कुमार), जतींदर सिंह (रुस्तुम ए पंजाब) वि. सत्येन्द्र मलिक (भारत केसरी), कमलजित (रुस्तुम ए हिंद) वि. माउली जमदाडे (भारत केसरी) आणि रेहान खान (मध्य प्रदेश केसरी) वि. कमल कुमार (शेर ए पंजाब) या १३ प्रमुख लढती होणार कुस्तीप्रेमींना दिग्गजांच्या कुस्त्या याची देही याची डोळा पाहाता येणार आहे. या दिग्गजांबरोबर खान्देश आणि परिसरातील १०० पैलवान सुद्धा या दंगलमध्ये आपल्या कुस्तीचे डावपेच दाखविणार आहेत. या मैदानात निवेदक म्हणून पै. सुरेश जाधव (चिंचोली),  शरद भालेराव (जालना), युवराज केचे हे उपस्थित कुस्तीप्रेमींना आपल्या मधाळ वाणीतून मंत्रमुग्घ करण्यासाठी सज्ज झाली आहेत. एवढेच नव्हे तर प्रसिद्ध हलगीवादक सुनील नागरपोळे हलगीवादन करून कुस्तीप्रेमी आणि कुस्तीपटूंना प्रोत्साहित करण्याचे कर्तव्य बजावणार आहेत.

विजेत्यांवर लाखोंच्या पुरस्कारांचा वर्षाव
११ फेब्रूवारीला जामनेरमध्ये रंगणारी दंगल संस्मरणीय व्हावी म्हणून ग्रामविकास, पर्यटन मंत्री, आमदार गिरीष महाजन यांनी १३ दंगलीतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव करणार असल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे तर विजेत्या खेळाडूला ३ किलो वजनाची चांदीची गदा आणि 'नमो कुस्ती महाकुंभ' हा मानाचा पट्टाही बहाल केला जाणार असल्याचे सांगितले. अव्वल दंगलीतील पराभूत खेळाडूलाही रोख पुरस्कार दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी जामनेरमध्ये  आपल्या मातीतील खेळाचे आयोजन करून तरुण पिढीला 'नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा' हा  संदेश आम्ही देणार आहोत. त्यामुळे जामनेरकरांनी न भूतो न भविष्यति ठरणार्‍या कुस्तीच्या महाकुंभाचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad