मुंबई - जागतिक संरक्षण माहितीचा मागोवा ठेवणा-या ग्लोबल फायरपॉवर या संकेतस्थळाने जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य असलेल्या देशांची २०२४ ची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जगातील महाशक्ती असलेल्या अमेरिकेचे सैन्य सर्वात शक्तिशाली आहे. दुस-या स्थानी रशिया आणि तिस-या स्थानी चीनचा क्रमांक आहे. तर भारत या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
ग्लोबल फायरपॉवर या संकेतस्थळाने क्रमवारीसाठी १४५ देशांचे मूल्यांकन केले असून सर्वोत्तम सैन्याचा निवाडा करण्यासाठी अनेक निकष अभ्यासण्यात आले आहेत. यामध्ये सैनिकांची संख्या, देशाच्या सैन्याकडे असलेली उपकरणे, आर्थिक स्थिरता आणि देशाचा अर्थसंकल्प, भौगोलिक स्थिती आणि उपलब्ध स्रोत आदी ६० पेक्षा अधिक घटक लक्षात घेतले आहेत. या घटकांच्या आधारे एकत्रित ‘पॉवरइंडेक्स’ गुणांक दिले जातात. या निर्देशांकानुसार गुणांक कमी असलेल्या देशांचे सैन्य ताकदवान समजण्यात आले आहे.
जगातील पहिले दहा ताकदवान देश -
१) अमेरिका, २) रशिया, ३) चीन, ४) भारत, ५) दक्षिण कोरिया, ६) ब्रिटन, ७) जपान, ८) तुर्किये, ९) पाकिस्तान, १०) इटली
यादीतील शेवटचे दहा देश -
१४५) भूतान, १४४) मोलदोवा, १४३) सुरीनाम, १४२) सोमालिया, १४१) बेनिन, १४०) लायबेरिया, १३९) बेलिझ, १३८) सिरा लिओन, १३७) मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, १३६) आइसलँड.
अमेरिकेची ताकद काय?
तांत्रिक प्रगती, वैद्यकीय क्षेत्र, हवाई क्षेत्र आणि संगणक/दूरसंचार क्षेत्रातही अमेरिका जागतिक पातळीवर आघाडीवर. यादीनुसार अमेरिकेकडे १३ हजार ३०० विमाने असून ९८३ लढाऊ हेलिकॉप्टर आहे. सैन्यदलात १४. ९४ कोटींपेक्षा जास्त मनुष्यबळ. निमलष्करी दल अस्तित्वात नाही. हवाई दलात सात लाख, पायदळात १४ लाख तर नौदलात ६.६७ लाखांपेक्षा जास्त मनुष्यबळ आहे.
भारताची ताकद काय ?
लष्करात ६५.७६ कोटींपेक्षा जास्त मनुष्यबळ आहे. निमलष्करी दलात २५.२७ लाख राखीव दल, हवाई दलात ३.१०, पायदळात २१.९७ लाख आणि नौदलात १.४२ लाख मनुष्यबळ एकूण ६०६ लढाऊ विमाने. त्यात १३० हल्ला करणारी लढाऊ विमाने, २६४ मालवाहू विमाने, ३५१ प्रशिक्षण विमाने, ७० विशेष मोहिमेसाठीची विमाने एकूण ८६९ हेलिकॉप्टर व ४० लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. पायदळाकडे चार हजार ६१४ रणगाडे, १.५१ लाखपेक्षा जास्त वाहने, १४९ स्वयंचलित तोफखाना आहे.

No comments:
Post a Comment