मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभरात सर्वेक्षण केले जात आहे. मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात 72.38 टक्के घरांना भेटी देण्यात आल्या. त्यापैकी 50.71 टक्के घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 14.72 टक्के घरे बंद होती तर 6.92 टक्के नागरिकांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिला आहे अशी आकडेवारी मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुरू आहे. मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून 23 जानेवारी पासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले. 28 जानेवारीपर्यंत 50 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याची आकडेवारी पालिकेकडून देण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी 28 लाख 7 हजार 518 म्हणजेच 72.38 टक्के घरांना भेटी देण्यात आल्या. त्यापैकी 19 लाख 66 हजार 926 म्हणजेच 50.71 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. 14.72 टक्के म्हणजेच 5 लाख 70 हजार 984 घरे बंद आढळून आली आहेत. तर 6.92 टक्के 2 लाख 69 हजार 495 नागरिकांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिला आहे.
No comments:
Post a Comment