एलटीटी स्थानकातील कॅन्टीनला आग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2023

एलटीटी स्थानकातील कॅन्टीनला आग


मुंबई - कुर्ला टिळक नगर येथील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एक वर असलेल्या जन आहार कॅन्टीनला बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आग पसरली आणि वेटींग रुम, तिकीट खिडकीपर्यंत पोहोचली. आगीचा भडका आणि धुराचे लोण पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. यावेळी एलटीटी स्थानकात शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. 

लोकमान्य टिळक टर्मिनसहून लांब पल्ल्याच्या गाड्यांची सतत ये जा सुरू असते. त्यामुळे एलटीटी स्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. एलटीटी स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एक वर जन आहार कॅन्टीन आहे. बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कॅन्टीनमध्ये आगीचा भडका उडाला. काही वेळातच आग वाऱ्यासारखी पसरली. वेटींग रुम, तिकीट खिडकीपर्यंत आग पसरली. एलटीटी स्थानक परिसरात धुराचे लोट उठल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यावेळी स्थानकात शेकडो प्रवासी असल्याने प्रवाशांची पळापळ झाली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अखेर दीड तासानंतर सायंकाळी ४.२५ वाजता आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून अग्निशमन दलाचे अधिकारी, स्थानिक पोलीस व रेल्वेचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad