नवी दिल्ली - मैलेट आणि फेनिलेफ्रिन या दोन औषधांच्या मिश्रणातून तयार केलेले सिरप किंवा गोळ्या (cold and cough medicine) सामान्य सर्दीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात. पण काही दिवसांपूर्वी या सिरपच्या वापरामुळे जगभरात १४१ मुलांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने भारतात चार वर्षांखालील मुलांना सर्दी आणि खोकल्याचे एकत्रित औषध देण्यास बंदी घातली आहे.
भारताच्या औषध नियामकने (डीसीजीआय) चार वर्षांखालील मुलांसाठी सर्दी, खोकला आणि तापावर सिरप वापरण्यावर बंदी घातली आहे. यासंदर्भातील सूचना केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने सोमवारी १८ डिसेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र लिहून दिल्या आहेत. या संदर्भातील इशारा केंद्र सरकारच्या औषध नियंत्रण कंपनीने भारतातील फार्मास्युटिकल कंपन्यांना दिला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या संबंधित संस्थेने, क्लोरफेनिरामाइन मैलेट आणि फेनिलेफ्रिन ही दोन औषधे एकत्र करूव तयार केलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबल लावण्यास सांगितले आहे.
No comments:
Post a Comment