नवी दिल्ली - नवी दिल्लीतील विज्ञानभवन येथे बौध्द भिख्खु संघाच्या सम्मेलन होणार आहे. या सम्मेलनाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण स्विकारल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. (Prime Minister Narendra Modi will attend the conference of the Buddhist Bhikkhu Sangha)
संसदेतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बौध्द भिख्खु संघातील बौध्द भिख्खुंची भेट घडवुन दिली. येत्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीत अखिल भारतीय भिख्खु संघाच्या विज्ञान भवन येथे आयोजित कार्यकमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण पुज्य भिख्खु संघाने दिले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूज्य बौध्द भिख्खु संघ आपल्या भेटीला आल्याबद्दल अत्यंत कृतज्ञपणे त्यांचे आभार मानले.
आपण महाकारूणिक तथागत भगवान बुध्दांच्या विचारांवर श्रध्दा ठेवणारे असून मला लहानपणापासुन माझ्या गावातील वडनगर येथील भिख्खु निवासामुळे बौद्ध धम्माची महतीची माहिती आहे. बौध्द धम्माबद्दल मला आदर आहे. भगवान बुद्धांना संपूर्ण जग आशियाचा ज्ञानसुर्य म्हणून मानते. पुजनीय भिख्खु संघ आल्याबद्दल मला आनंद वाटल्याची नम्र भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावात भिख्खु निवास आहे. तेथे चिनी प्रवासी युवान शँग हे येवून गेले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या कार्यालयात आणि घरी भगवान बुध्दांची भव्य मुर्ती स्थापन करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भगवान बुध्दांच्या धम्माबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल प्रचंड आदर आहे. अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.
येत्या फेब्रुवारीत नवी दिल्लीतील विज्ञानभवन येथे बौध्द भिख्खु संघाच्या सम्मेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ते निमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्विकारल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. अखिल भारतीय बौध्द भिक्खू संघाच्या शिष्टमंडळामध्ये भदंत करुणानंद महाथेरो, पुज्य भदंत डॉ. राहुलबोधी महाथेरो, पुज्य भिख्खुनंद विवेचन आणि पुज्य भदंत प्रज्ञादिप या भिख्खु संघाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेतली.
No comments:
Post a Comment