मुंबई - मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. पश्चिम आणि मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्म नंबर एकाच क्रमांकाचे असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. प्लॅटफॉर्म नंबरमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या आज ९ डिसेंबर २०२३ पासून प्लॅटफॉर्मच्या नंबरमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मच्या नंबरमध्ये झालेल्या बदलाची नोंद प्रवाशांनी घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (New platform numbers at Dadar)
मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील
प्लॅटफॉर्मच्या नंबरमध्ये बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उपनगरीय ट्रेन इंडिकेटर, उपनगरीय गाड्यांची घोषणा, प्लॅटफॉर्मवर डिस्प्ले बोर्ड, एफओबी फूट ओव्हर ब्रिजवर प्लॅटफॉर्म मार्गदर्शन फलक, मेनलाइन मेल एक्सप्रेस इंडिकेटर, मेल एक्सप्रेस प्रशिक्षक मार्गदर्शन फलक, मेल एक्सप्रेस घोषणा प्रणाली यात बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलाची माहिती प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी हेल्प डेस्क देखील स्थापित केला आहे.
असे करण्यात आले आहेत बदल -
- आधीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1- PF क्रमांक 8 असेल
- आधीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2- पीएफ क्रमांक 1 रुंदीकरणासाठी कायमचा बंद करण्यात आला आहे.
- आधीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 3- PF क्रमांक 9 असेल
- आधीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 4- PF क्रमांक 10 असेल
- आधीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 5- PF क्रमांक 11 असेल
- आधीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 6- PF क्रमांक 12 असेल
- आधीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 7- PF क्रमांक 13 असेल
- आधीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 8- PF क्रमांक 14 असेल
No comments:
Post a Comment