मुंबईकरांनी स्वतःच्या इच्छेने मास्कचा वापर करावा - पालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2023

मुंबईकरांनी स्वतःच्या इच्छेने मास्कचा वापर करावा - पालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन


मुंबई - जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरियंटमुळे नवे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. नव्या व्हेरियंटबाबत सतर्क राहण्याच्या सूचना केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. मुंबईतही कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, स्वतःच्या इच्छेने मास्कचा वापर करावा तसेच कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे. (Mumbaikars should use masks of their own free will)

कोरोनाचा जेएन-1 हा नवा व्हेरिएंट आला आहे. हा व्हेरियंट सौम्य प्रकाराचा आहे. हा व्हेरिएंट सौम्य असल्याने घाबरण्याचे कारण नाही. लोकांनी पॅनिक होऊ नये योग्य ती खबरदारी घ्यावी. सद्यस्थितीला कोरोनाचे 17 सक्रिय रुग्ण आहेत. ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत, तसेच मधूमेह आहे, अशा रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असं शाह यांनी सांगितलं. 

व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. कालच पालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेवून काही सूचना केल्या आहेत, कोरोना परिस्थिती आणि व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. ऑक्सिजन बेड्स, आयसीयू तसेच इतर यंत्रणा तयार आहेत. आम्ही वारंवार सूचना आणि मार्गदर्शन घेत आहोत. प्रयोगशाळांची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. दवाखाने आणि मोठे हॉस्पिटल यांनाही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार लोक मास्कचा वापर करू शकतात, असं दक्षा शाह यांनी स्पष्ट केलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला रुग्ण - 
कोरोना व्हायरसचा नवीन उपप्रकार जेएन 1 चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलाय. हा रुग्ण 41 वर्षांचा पुरुष आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागानं केल्यायत. याचबरोबर कोरोना टेस्ट वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

आतापर्यंत देशात 6 रुग्णांचा मृत्यू - 
कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1नं केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. कालच्या दिवसभरात केरळमध्ये कोरोनाचे 300 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 669 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 3 रुग्ण एकट्या केरळमधील आहेत तर दोन कर्नाटकातील आणि एक पंजाबमधील आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad