धारावीतील अनधिकृत बांधकाम तोडा, पालिकेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2023

धारावीतील अनधिकृत बांधकाम तोडा, पालिकेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र


मुंबई - मुंबईत धारावी पुनर्विकासाचा (Dharavi Redevelopment Project) मुद्दा गाजत आहे. धारावी प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थन करण्यासाठी मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर अदानी यांनी शरद पवार व राज ठाकरे यांची भेट घेतली. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) धारावीतील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना (Mumbai Collector) पत्र लिहिले आहे. 

धारावी पुनर्विकास प्रकल्प - 
धारावी पुनर्विकास प्रकल्प उद्योगपती गौतम अदानी यांच्या माध्यमातून साकारला जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सुमारे पाच हजार कोटींची निविदा अदानी (Gautam Adani) यांना देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2000 सालापर्यंतच्या झोपडी धारकांना या ठिकाणी अदानी उद्योग समूहाकडून होत असलेल्या पुनर्विकासामध्ये 305 चौरस फुटाचे घर मिळणार आहे. तर साल 2000 ते 2011 पर्यंत इथे उभारण्यात आलेल्या घरांना बाजारभावाप्रमाणे स्वतः पैसे भरून घर मिळवता येणार आहेत. 2000 नंतरची सगळी घरं ही अनधिकृत असल्याने त्यावर तोडक कारवाई करण्यात यावी, असे पत्र मुंबई महालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. 

पालिकेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - 
मुंबई महानगरपालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना धारावीतील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पत्र जारी करण्यात आलं आहे. मुंबईतील धारावीचा पुनर्विकास जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी अनेक अनधिकृत बांधकाम सुरू झाले आहेत. जी अनधिकृत बांधकाम आहेत, त्यावर तातडीने तोडक कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र मुंबई महानगरपालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे सोमवारपासून आशियातील या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत भरारी पथक नेमून या सर्व परिसराची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या गोष्टीला राजकीय विरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

प्रकल्पाला विरोध - 
राज्य सरकारने फक्त अदानी यांनाच धारावी पुनर्विकास प्रकल्प का दिला, या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. धारावीतील नागरिकांना प्रत्येकी 500 चौरस फुटाचं घर मिळावं, अशी देखील मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी या मुद्द्यावरुन धारावीत भव्य मोर्चा काढला होता. त्यामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर आता भीम आर्मी या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे सुद्धा धारावीकरांची भेट घेणार आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad