मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर ) डॉ. अश्विनी जोशी यांनी दादर येथील चैत्यभूमीवर तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने तयारीचा आज आढावा घेतला. अनुयायांसाठी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी निवारा, प्रकाश व्यवस्था, अन्नदान वितरण व्यवस्था, शौचालयाची सुविधा तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात करण्यात आलेल्या तयारीची त्यांनी पाहणी केली. नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या. यावेळी परिमंडळ २ चे उपआयुक्त रमाकांत बिरादार आणि जी उत्तर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post Top Ad
02 December 2023
Mahaparinirvan Din - अश्विनी जोशी यांनी घेतला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
JPN NEWS
'जेपीएन न्यूज' हे २०१२ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या, ताज्या घडामोडी, राजकारण, मंत्रालय, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते.
No comments:
Post a Comment