वारंवार सर्च करणाऱ्या ७३% ग्राहकांच्या हवाई, हॉटेल दरात वाढ ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 December 2023

वारंवार सर्च करणाऱ्या ७३% ग्राहकांच्या हवाई, हॉटेल दरात वाढ !


मुंबई - ऑनलाइन खरेदी (Online shopping, Online Booking) ग्राहकांसाठी वेळ वाचवणारी आणि सोयीस्कर असू शकते, परंतु इंटरनेट सर्वेक्षणातून काही धक्कादायक निष्कर्ष पुढे आहेत. जे ग्राहकांना बर्‍याचदा अशा ठिकाणी घेऊन जातात ज्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छेपेक्षा जास्त खर्च करण्यास प्रवृत्त केले जाते. एका सर्वेक्षणातून, असे समोर आले आहे की, 73% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, त्यांना अनेकदा इंटरनेटवर सर्च केल्यानंतर हवाई भाडे/हॉटेल रूमच्या (Hotel Booking) दरांमध्ये वारंवार वाढ झाल्याचे अनुभव आले आहेत.

डार्क पॅटर्न -
“या डार्क पॅटर्नवर बंदी घालणार्‍या सरकारी अधिसूचनेनंतर, आम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून प्रवास किंवा हॉटेल बुक करताना ग्राहकांना त्यांना असा अनुभव कोठे आला हे शोधण्यासाठी आम्ही एक सर्वेक्षण केले,” असे लोकल सर्कलचे संस्थापक सचिन टपारिया म्हणाले.

“ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर ग्राहकांनी अनुभवलेल्या काही सामान्यपणे नोंदवलेल्या डार्क पॅटर्न समस्यांमध्ये यूजर्सच्या शोध पॅटर्नवर आधारित किंमतीतील फेरफार, बुक करण्याची उत्सुकता, हिडन चार्जेस आणि फॉल्स अर्जेंसी दाखवणे यांचा समावेश होतो,” असेही टपारिया यांनी नमूद केले.

फॉल्स अर्जेंसी, छुप्या शुल्कांचा अडथळा
एकूण 74% ट्रॅव्हल अ‍ॅप/साइट यूजर्सनी सर्वेक्षणात म्हटले आहे की, त्यांना फॉल्स अर्जेंसीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे आणि 67% ग्राहकांनी सांगितले की, त्यांना अंतिम पेमेंट स्टेज दरम्यान फ्लाइट तिकीट/हॉटेल बुकिंगशी संबंधित छुप्या शुल्कांचा अनेकदा अनुभव आला आहे.

या सर्वेक्षणाला भारतातील 323 जिल्ह्यांतील ग्राहकांकडून 33,000 हून अधिक प्रतिसाद मिळाले आहेत. लोकल सर्कल्सने सांगितले की, 47% प्रतिसादकर्ते टियर 1 मधील होते, 33% टियर 2 मधील आणि 20% प्रतिसादकर्ते टियर 3, 4 आणि ग्रामीण जिल्ह्यांतील होते.

ट्रॅव्हल अ‍ॅप/साइट्स वापरणाऱ्यांपैकी चारपैकी तीन जणांनी वारंवार भाडे/दर वाढीचा अनुभव घेतल्याचे सांगितले. विमान भाडे आणि हॉटेल रूमच्या दरांमध्ये बदल काही मिनिटांत होतो जेव्हा ते अजूनही त्यांची फ्लाइट किंवा हॉटेल शोधत असतात.

काही मिनिटांत भाडेवाढीचा अनुभव -
सर्वेक्षणात प्रतिसादकर्त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही प्रवास अ‍ॅप, साइट्सवर किती वेळा अनुभव घेतला आहे की, तुम्ही शोधत असताना काही मिनिटांत विमान भाडे/हॉटेल रूमचे दर वाढले आहेत?” या प्रश्नावर 11,001 प्रतिसाद मिळाले. यातील 73% प्रतिसादकर्त्यांनी असे सूचित केले की, त्यांच्यासोबत अगदी वारंवार असे घडत आहे. तर २०% प्रतिसादकर्त्यांनी सूचित केले की, त्यांच्यासोबत असे प्रकार कधीकधी घडतात.

सरकारकडून तंबी - 
अलीकडील जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने जाहिरातदार आणि विक्रेत्यांना इशारा दिला आहे. तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या यूजर्सना ते मुळात करू इच्छित नसलेले काहीतरी करण्यासाठी दिशाभूल करण्यासाठी किंवा फसवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या फसव्या पद्धती (Dark Pattern) वापरण्यापासून दूर राहाण्यास सांगितले आहे. कधी कधी यूजर्स स्प्लिट-सेकंडच्या निर्णयाप्रमाणे हॉटेल रूम बुक करण्याचा निर्णय घेतात कारण वेबसाइटवर त्यांना सांगितले जाते की हॉटेलमध्ये फक्त एक रुम शिल्लक आहे. किंवा ग्राहकांना घाबरवण्यासाठी पॅसिव्ह-आक्रमक भाषा वापरली जाते ज्याद्वारे तुम्हाला अ‍ॅड-ऑन उत्पादन जसे की, प्रवास विमा, विमान तिकीट खरेदी करण्यास प्रवृत्त केले जाते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad