मुंबई - गिरगावच्या गोमती भवन या इमारतीला शनिवारी रात्री आग लागली. ही आग रविवारी पहाटे विजविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत ९ जणांची अग्निशमन दलाने सुटका केली असून दोन वयोवृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (Fire in Mumbai)(Fire in Girgaon)
गिरगाव चौपाटी येथे गोमती भवन ही तळ अधिक तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात शनिवारी ३ डिसेंबर रोजी रात्री ९.३२ वाजता आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या ठिकाणाहून अग्निशमन दलाने ९ जणांना सुखरूप बाहेर काढले. याच इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एका घरात दोन मृतदेह अग्निशमन दलाला आढळून आले. हे दोन्ही मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हिरेन शाह वय ६० वर्षे आणि नलिनी शाह ८२ वर्षे अशी मृतांची नावे आहेत. इमारतीला आगीवर आज ४ डिसेंबर रोजी पहाटे ३.३५ वाजता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
No comments:
Post a Comment