वालभाट नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पर्यावरण व नदी संवर्धनासाठी गरजेचा - खासदार गोपाळ शेट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 November 2023

वालभाट नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पर्यावरण व नदी संवर्धनासाठी गरजेचा - खासदार गोपाळ शेट्टी


मुंबई - मुंबई पालिकेने नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. गोरेगाव येथील वालभाट नदी पुनरुज्जीवन करताना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पर्यावरण व नदीचे संवर्धनासाठी खुप गरजेचे असल्याचे मत स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी व्यक्त केले आहे. तर वालभाट नाल्याचे रूपांतर नदीमध्ये झाल्यावर त्याचा फायदा पुढच्या पिढीला घेता येईल असे माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी म्हटले आहे. 

मुंबई महापालिकेच्या नदी पुनरुज्जीवन व सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत अनेक नद्यांचे पुनरुज्जीवन सुरू असून गोरेगाव पूर्व आरे जंगलातून उगम पावणारी वालभाट नदी पुनरूज्जीवन व सुशोभीकरण काम सुद्धा त्या अंतर्गत घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणचा पाहिला टप्प्यातील मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते  धीरज वैली गोकुळधाम गोरेगाव पूर्व प्रभाग 52 येथे पार पडला. यावेळी बोलताना,   आपल्या लहानपणी दहिसर, पोइसर या नद्या राष्ट्रीय उद्यानातून निघताना किती स्वच्छ असायच्या, याचा अनुभव सांगून पुन्हा एकदा वालभाट सारख्या नद्यांना त्यांचे मूळ स्वरुप प्राप्त होणार असल्याचे समाधान व्यक्त केले.  त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधीनी व नागरिकांनी या सर्व कामावर लक्ष ठेऊन ते वेळेत पूर्ण होईल याची खात्री करावी अशी सूचना शेट्टी यांनी केली.  

प्रिती सातम यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, तबेला, इंडस्ट्रीज व रहिवाशी विभागातून नदी प्रदुषित करणारे सांडपाणी व या प्रदूषणामुळे या नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे. नदीला आपलं मूळ रूप प्राप्त करून देण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. आरेच्या जंगलामधून निघून ओशिवरा खाडीला ही नदी जाऊन मिळते. या नदीचा सध्या नाला झाला आहे. या नाल्याचे पुन्हा नदीत रूपांतर करण्यासाठी सुशोभीकरण, पुनरुज्जीवन कामाची सुरुवात होत आहे. त्याअंतर्गत मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. 

या प्रकल्पांतर्गत एसटीपी त्याचा कामाची सुरूवात होत आहे. त्याच पद्धतीने नदीमध्ये झालेले अतिक्रमण, भराव काढून टाकणं नदीचं पात्र रुंद करणे, त्याच्यासोबत नदीच्या दोन्ही बाजूने रस्त्याची व्यवस्था करणे, झाडे लावून त्या ठिकाणी  सुशोभीकरण करणं, लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क, इतकंच नव्हे तर नदीमध्ये फिरण्यासाठी बोटिंगची व्यवस्था अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. पुढच्या काही वर्षांमध्ये या नाल्याचे रूपांतर नदीमध्ये झालेलं असेल आणि आपल्या पुढच्या पिढीला त्याचा लाभ घेता येईल असे सातम म्हणाल्या. 

या प्रसंगी भाजपचे वार्ड 52 मधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad