Shivsena Clash - बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे, शिंदे गट आपसात भिडले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2023

Shivsena Clash - बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे, शिंदे गट आपसात भिडले


मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन १७ नोव्हेंबर रोजी आहे. स्मृतिदिनाच्या एक दिवस आधी शिवसनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी गेले असता शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले. शिवाजी पार्कवर स्मृतिस्थळावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर ठाकरे गटाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान स्मृतीदिनाला गोंधळ घालून गालबोट लावू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

स्मृतीदिनाला गालबोट लावू नका -
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेऊन स्मृती दिनाच्या एक दिवस आधी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबाना अभिवादन करतो. मात्र त्यांच्या स्मृतीदिनाला गोंधळ घालून गालबोट लावण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमीच असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. 

स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही  सर्वांची जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खरंतर मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्यक्ष स्मृतीदिनी जाऊन अभिवादन केले तरीही आपल्याला कुणी अडवू शकणार नाही. मात्र तरीही तसे करणे आपण टाळले कारण यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशीच माझी इच्छा होती.

आजही दरवर्षीप्रमाणे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी स्मृती स्थळावर जाऊन मी दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आले नव्हते,मात्र मी निघाल्यावर तिथे उबाठा गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब तिथे आले आणि आमच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. तसेच महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नसून यांच्या स्मृतिदिनी विनाकारण अशांतता निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad