मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायांसाठी शिवाजी पार्क येथे विविध सेवा सुविधा पुरविणाऱ्या विविध संस्था संघटनांची संबंधित मंडप डेकोरेटर्सकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारून पिळवणूक केली जात असल्याची तक्रार भीम आर्मी या सामाजिक संघटनेने मुंबई महानगरपालिकेला केली आहे या डेकोरेटर्सना आवर घालून महानगरपालिकेने हे मैदान ताब्यात घ्यावे अन्यथा सर्व आयोजकांना घेऊन महानगरपालिकेसमोर आंदोलन केले जाईल असा ईशारा या संघटनेने दिला आहे
दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात राज्यातील विविध सस्था संघटना युनियन तसेच राजकीय सामाजिक संघटनांकडून आंबेडकरी अनुयायांसाठी विविध उपक्रम राबविले जातात जाहीर अभिवादन सभा,विनामूल्य भोजन दान, चहा, नाश्ता, पाणी, आदी सोयी पुरविल्या जातात.यासह विविध बुक स्टॉल, व विविध कार्यक्रमांचे स्टॉल लावले जातात. याकामी मंडप, साऊंड सिस्टीम आदींसाठी शिवाजी पार्क येथील चार ते पाच डेकोरेटर्स अनेक वर्षांपासून आयोजकांकडून एका दिवसासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारत असल्याची तक्रार भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी संबंधित जी नॉर्थ मनपा सहाय्यक आयुक्त याना पत्र पाठवून केली आहे .
मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी विविध सेवा सुविधा पुरविण्यासाठी निधी आरक्षित केलेला आहे महानगरपालिकेमार्फत विविध सेवाही पुरविल्या जातात शिवाजी पार्क येथे विविध उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांकडून प्रत्येक स्टॉलसाठी महानगरपालिका काही रक्कम आकारते मात्र शिवाजी पार्क येथे स्टॉल किंवा मंडप साउंड सिस्टीम साठी खाजगी डेकोरेटर्स आयोजकांकडून पाच ते दहा हजार इतकी अवास्तव रक्कम आकारात असल्याची नाराजी आयोजकांकडून व्यक्त केली जात आहे
मुंबई महानगरपालिका जर मंडप आणि स्टॉलसाठी भाडे आकारत असेल तर महानगरपालिकेनेच आपल्या आरक्षित निधीतून शिवाजी पार्कची जवाबदारी घ्यावी मनमानी करणाऱ्या सबंधित डेकोरेटर्सवर आला घालावा अन्यथा सर्व आयोजकांना सोबत घेवून आंदोलन करण्यात येईल असा ईशारा कांबळे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment