मुंबई - आज मी मुख्यमंत्री नाही आहे, मविआ सरकार नाहीे. मात्र आरोग्य व्यवस्था तीच आहे. कोरोना सारख्या संकटाचा सामना या आरोग्य व्यवस्थेने केला होता. त्याच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. गुवाहटीमध्ये टेबलवर नाचायला पैसे आहेत, मजामस्ती करायला पैसे आहेत, पण औषधासाठी पैसे नाहीत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. एक फूल दोन हाफ कुठे आहेत. सरकारकडे औषधांसाठी पैसे नाही म्हणता, पण परदेश दौरा सुरु आहे, जाहीरातबाजी करण्यासाठी सरकारकडे पैसे कुठून येतोय, असा थेट सवाल त्यांनी केला.
हे सरकार नपुसक असल्याचं कोर्टानं सुद्धा म्हटलंय. मी शिवसैनिकांना सांगतोय आपल्या सरकारी रुग्णलयात जा. तिथे वस्तुस्थिती काय आहे, डीन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन समजून घ्या. हा कारभार माणुसकीला सोडून चालू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सलग सुट्या येतात तेव्हा डॉक्टरांच्या ड्युटी लावण्यात येतात. त्या कश्या लावण्यात आल्या ते बघावं लागेल. मनुष्यबळ कमी होते ते आम्ही जेव्हा होतो तेव्हा सुद्धा कमी होते. मनुष्यबळाचं कारण देतात ते कोरोना काळात सुद्धा होतं. हे भ्रष्टाचाराच कारण असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. कोर्टाने राज्य सरकारला काहीतरी निर्देश द्यावेत त्यांना खडसावले पाहिजे. कोणतीही साथ नसताना मनुष्यबळ कसे कमी पडते असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
एक फुल्ल दोन हाफ दिल्लीत -
कोरोना काळात मुंबई मॉडेल असेल, दुर्गम भागात औषधे पुरवलीत. ड्रोनने दुर्गम भागात औषधे पुरवली. मी देखील दुर्गम भागात भेट दिली होती. अनेक डॉक्टर-नर्सचा मृत्यू झाला. आज त्यांना बदनाम केले जाते. ठाणे हॉस्पिटल असेल दुर्घटना घडताहेत, मुख्यमंत्री कुठे आहेत. एक फुल दोन हाफ कुठे आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत आहे. एक फुल, एक हाफ दिल्लीत आहेत. दुसरा हाफ कुठे आहे, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
टेबलवर नाचायला पैसे, औषधासाठी नाही? -
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या काळात आम्ही सक्षमपणे लढा दिला. पण, सरकार बदलले आणि आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी नांदेड, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूचा उल्लेख केला.
आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा -
विषय रोज नवीन नवीन आहेत. काही विषय खूप वर्षांपासून तसेच्या तसे आहेत. आज मी जरा अस्वस्थ आहे. सध्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेत, ते बघितल्या नंतर चीड येते. आज मी मुख्यमंत्री नाहीये, मविआ सरकार नाहीये. आरोग्य व्यवस्था तीच आहे. कोरोना सारख्या संकटाचा सामना केला. त्याच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
No comments:
Post a Comment